आ. खाडेंकडून विकासकामांचा धडाका सुरुच ; मालगाव येथील 1 कोटी 67 लाखांच्या कामांचा शुभारंभ
मिरज (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरु केला असून सोमवार मालगाव येथील नागरीसुविधा, डी. पी. सी. 25:15 आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल 1 कोटी 67 लाख 21 हजार रुपयांच्या 10 विकासकामांचा शुभारंभ आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याच गावातील अन्य 9 कामांसाठीच 86 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरु होणार आहेत. मालगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामेकरून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आ.खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे. सदरील गावामध्ये रस्ते, गटार, सभामंडप इत्यादी या विकासकामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा शुभारंभ आ.सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी युवा नेते सुशांत खाडे, काकासो धामणे, मयूर नायकवाडी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


