गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

0
gpmt

मिरज (प्रतिनिधी)

येथील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करत साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाकडून वाचन प्रेरणा दिन व पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

डॉ. कलाम हे शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते, त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट राज्यामध्ये वाचन संस्कृती वाढवणे आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरीता आपल्या ग्रंथालयामध्ये अध्यापन पुस्तकांच्या सोबत अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध आहेत याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, कॅम्पस कोऑर्डीनेटर डॉ. सतिश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपथित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *