रयतच्या शाहू कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन अभिनव पद्धतीने साजरा

0
शाहू काँलेज

वाचन कट्टा उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. डी आर. भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कोल्हापूर.(प्रतिनिधी)  डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे ग्रंथालय विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

          सर्वप्रथम डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने थोर महापुरुषांच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविले होते. दिवसभर चाललेल्या ह्या प्रदर्शनास महाविद्यालयाच्या विविध वर्गाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

        विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वाचन करता यावे, विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वृंद्धीगत व्हावी. ह्या उद्देश्याने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) व महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ. संगीता पाटील यांच्या कल्पकतेतून महाविद्यालयाच्या आवारात दोन ठिकाणी वाचन कट्टा तयार करण्यात आला आहे. ह्या कट्ट्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. डी आर. भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

      वाचन प्रेरणा दिनाच्या विविध उपक्रम संपन्न करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. बी.एस. चिखलीकर व ग्रंथालय विभागाचा सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. ह्या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. यु.एस.शेळके, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. उबाळे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. एम. बी. देसाई, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. पी. बी. पिस्टे व महाविद्यालयातील विविध वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *