जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आता सांगलीमध्ये ; शोरुमचे गुरुवारी उद्घाटन

0
image

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
सांगली शहरातील सरस्वती नगर, विश्रामबाग, सांगली येथे गुरूवार दि.१६ रोजी सुप्रसिद्ध जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या नवीन शोरुमचे उद्घाटन होणार आहे. गुणवत्तेचा आणि विश्वासाचा ठसा उमटवणाऱ्या या ज्वेलर्सच्या नव्या शोरुममुळे सांगली व परिसरातील ग्राहकांना सोने, चांदी, हिरे तसेच मौल्यवान दागिन्यांची आकर्षक श्रेणी एका छताखाली अनुभवता येणार असल्याचे डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, कराड, महाड, कोल्हापूर आणि आता सांगलीमध्ये आम्ही आमची शाखा सुरु करीत आहोत. येथेही आपण मला भरघोस प्रतिसाद द्याल हा विश्वास आहे. या शोरुममध्ये पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिक डिझाइन्सपर्यंत विविधता पाहायला मिळणार असून प्रत्येक दागिना ही एक वेगळी कलाकृती असल्याची भावना ग्राहकांना जाणवेल. उत्कृष्ट कारागिरी, सोन्याची आकर्षक कलाकुसर आणि उत्तम ग्राहकसेवा या तिन्ही गोष्टींचे संगम या नव्या शोरुममध्ये पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सांगलीतील व्यावसायिक, समाजसेवी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स व सवलतींची घोषणाही करण्यात आली असून प्रत्येक खरेदीवर कॉईन जाणार आहे. ‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स’ हे नाव गेल्या अनेक दशकांपासून प्रामाणिक व्यवहार, दर्जेदार दागिने आणि ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. आता या नव्या शोरुमच्या माध्यमातून सांगलीतही त्या परंपरेचा सुवर्ण अध्याय सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *