विद्यार्थ्यांनी सर्जनात्मक विध्वंस ही संकल्पना समजून घ्यावी: डॉ सुभाष कोंबडे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अद्वैत जोशी , संस्थेचे चेअरमन मा. ॲड .कापसे साहेब यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले
कोल्हापूर.(प्रतिनिधी) येथील महावीर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञांचे आर्थिक विचार अर्थशास्त्रातील योगदान समजून घेण्याच्या हेतूने पोस्टर प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांचे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सुभाष कोंबडे , प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी यंदाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाची व ग्रंथांची माहिती घेऊन पोस्टर करून त्याचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष कोंबडे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी सर्जनात्मक विध्वंस ही संकल्पना समजून घ्यावी . वर्तमानातील AI आधारित तंत्रज्ञान रोजगार विश्व मध्ये अनेक रचनात्मक विध्वंस निर्माण करत आहे. हा सुरजनात्मक विध्वंस भविष्यात अर्थव्यवस्थेत रचनात्मक बदल घडवून आणेल. म्हणून भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने या रचनात्मक विध्वंसामध्ये एक विद्यार्थी आणि युवक म्हणून आपण कुठे आहोत याचा शोध विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नवे तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि रोजगाराशी संबंधित नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे कामाचे आयोजन डॉ.सुजाता पाटील, डॉ संजय ओमासे यांनी केले .त्यांना विभागातील प्राध्यापक सयाजी हुंबे , मानसिंग पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अद्वैत जोशी , संस्थेचे चेअरमन मा. ॲड .कापसे साहेब यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले.


