कमला कॉलेजमध्ये “भावनिक परिपक्वता, आंतरवैयक्तिक सबंध आणि आकर्षण” केंद्रित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त)
कोल्हापूर,(प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज क्लस्टर परिक्षेत्र अंतर्गत मानसशास्त्र विभागाच्या वतीने “महाविद्यालयीन विद्यार्थी : भावनिक परिपक्वता, आंतरवैयक्तिक संबंध आणि आकर्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुरेश संकपाळ, लिड कॉलेज समन्वयक प्रा.अश्विनी कुंभार यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेतील प्रमुख सत्रांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डॉ. सुरेश संकपाळ, डॉ. मिलिंद मानकर आणि प्रा. डॉ. अनिल घस्ते हे वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच सत्राध्यक्षा म्हणून प्रा. शास्वती कुलकर्णी, प्रा. डॉ. नीता धुमाळ आणि श्रीमती उर्मिला कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय समिती सदस्य न्यू कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. आर. के. आढाव यांची उपस्थित लाभली.
या उपक्रमासाठी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील साहेब यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन मानसशास्त्र विभागाचे प्रा. अशोक पाटील आणि प्रा. सारिका घाटे यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. चिन्मयी सांगळे व प्रा. हेमलता मिणचेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियंका माळी तर आभार प्रा. श्रीदेवी वाघमारे, प्रा. पूजा पाटील व प्रा. निलेश क्षीरसागर यांनी केले कार्यशाळेस विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक विकासासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.


