ग्राहकाला आपुलकीची वागणूक द्या.अन्नसुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील
सांगरूळ व्यापारी असोसिएशन, ता.करवीर ची वार्षिक सर्वसाधारण सभा
सांगरूळ.(प्रतिनिधी)
व्यवसायातील यश व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील आपुलकीवर अवलंबून असतो .ग्राहकाला आपुलकीची वागणूक द्या . विविध व्यवसायाबाबत असणाऱ्या शासकीय नियमांचे पालन काटेकोरपणे करावे .असे आवाहन अन्नसुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी केले .ते सांगरूळ व्यापारी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असोसिएशनच्या सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते . सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे होते.
यावेळी बोलताना रमाकांत पाटील यांनी अन्नधान्य व्यवसायाबाबत असणाऱ्या कायद्यांच्या बाबत मार्गदर्शन केले. तसेच अनधान्य प्रतिबंधक कायदा व विविध व्यवसायाच्या परवाना घेण्याबाबत कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली .
पदार्थ बनवण्याची ठिकाण व दुकानातील मालाची स्वच्छता ठेवा .अन्नपदार्थ तयार करणाऱ्यां व्यक्तीने पोशाखाचे नियमाचे काटेकोर पालन करावे . खाद्यपदार्थ तयार करताना योग्य पाण्याचा वापर करावा .अन्नधान्य प्रशासनाच्या कायद्यांचे पालन करून व्यवसाय करा असे आवाहन रमाकांत पाटील यांनी यावेळी केले .
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक करताना व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी केले .व्यापारी असोसिएशनची स्थापना व आतापर्यंत असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाची माहिती दिली . अहवाल वाचन व सूत्रसंचालन अनिल घराळ यांनी केले. विविध पदावर नियुक्ती झालेल्या सभासदांचा सत्कार असोशिएशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला.
यावेळी भगवान लोंढे, उदय म्हेत्तर,बाबुराव नाळे, महादेव खाडे, अनिल नाळे, प्रशांत कांबळे, सचिन उबारे, सुरेखा तोरस्कर उप सरपंच, एकनाथ कोपार्डेकर, अर्जुन मोहिते, सादिक मुल्ला, प्रकाश पाटील जोतिराम खाडे
यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते .


