आनंद माने यांची सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड
आनंद माने यांची सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड
कोल्हापूर, (प्रतिनिधी):
कोल्हापूर येथील हॉटेल व बांधकाम व्यावसायीक श्री. आनंद शंकरराव माने यांची सेंट्रल रेल्वेच्या पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समिती (DRUCC), पुणे झोन च्या सदस्य पदी निवड झाली. खा. शाहू छत्रपती महाराज यांच्या शिफारशी वरुन त्यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांचा कार्यकाळ असणाऱ्या या समितीत त्यांनी यापूर्वीही कार्य केले आहे.
आनंद माने यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असताना कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे सुरु होणेसाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. तसेच सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीत काम करताना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर असणाऱ्या समस्या मांडल्या होत्या. त्या समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना देखील सांगितल्या होत्या. रेल्वे च्या प्रश्नांसंबंधी त्यांच्या असणाऱ्या अनुभवावरुन त्यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


