साळुंखे महाविद्यालयात आंतरविभागीय महिला बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

0
WhatsApp Image 2025-10-17 at 3.05.19 PM

मिरज (प्रतिनिधी)
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात आंतरविभागीय महिला बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्याहस्ते तसेच प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते विवेक शेटे, ज्योतीराम जाधव आणि जितेंद्र सव्वाशे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉ. आकाश बनसोडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून एकूण १२ संघांनी सहभाग घेतला. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी विद्यापीठाकडून खेळाडूंना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि खेळ क्षेत्रातील संधी यांची सविस्तर माहिती दिली. पद्मावती फाउंडेशनचे संस्थापक विवेक शेटे यांनी खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

या स्पर्धेतून शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडला जाणार असून तो संघ मध्य प्रदेश, ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. निवड समितीमध्ये डॉ. सुरेश खराटे (अध्यक्ष), डॉ. निलेश पाटील आणि प्रा. संजय पाटील हे सदस्य म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून दीपक पाटील, अमीर मुल्ला, स्वप्निल खतकर, विनायक पवार, साद मुलानी, आकाश कोळी, विनायक चव्हाण, कु. वैदही गाडे व कु. सांची बनसोडे यांनी काम पाहिले. स्पर्धेत पी. के. आय. ई. टी., वारणानगर महाविद्यालयाने प्रथम, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने द्वितीय क्रमांक, आर. आय. टी. कॉलेज, इस्लामपूरने तृतीय तर चतुर्थ क्रमांक के. आय. टी. कॉलेज, कोल्हापूरने पटकावला. बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे मिरज शहरातील उद्योगपती व समाजसेवक मयूर निकम होते. यावेळी मुलानी सर, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, जिमखाना प्रमुख डॉ. आकाश बनसोडे, समिती सदस्य, शारीरिक शिक्षण संचालक, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील सर्व आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *