मिरजेत वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन ; मितेश पवार युवामंच कडून नियोजन
मिरज (प्रतिनिधी)
वसुबारसनिमित्त शहरातील मंगळवार पेठ येथे महिलांनी गोमातेचे पूजन केले. मितेश पवार युवा मंच कडून आयोजन केले होते. परिसरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या वर्षभरात पीक पाणी चांगलं होऊ दे, मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळू दे अशा मनोकामना महिलांनी व्यक्त केल्या. परिसरातील महिलांना गाय व वासरूची पूजा करता यावी म्हणून मितेश पवार मंच ने गाय व वासरू उपलब्ध केले होते.
यावेळी मितेश पवार यांनी गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज येथील आपल्या प्रभागातील आयेशा युनूस मंगळवारे हिने बीएचएमएस परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा. नगरसेवक करण जामदार, अवधूत जाधव, अरुण पवार, अजित पवार, किशोर कोकाटे, विजय बाबर,अभिषेक कोकाटे, दिपक जाधव, युवराज कार्वेकर, युसुफ मंगळवारे, नितीन चौगुले, अमर कार्वेकर व बहुसंख्य नागरिक तथा महिला भगिनी उपस्थित होत्या.


