दिवाळीसाठी सांगली-मिरजेत ‘बसाप्पा हलवाई’च्या मिठाईला सर्वाधिक पसंती
मिरज (प्रतिनिधी)
चवदार आणि दर्जेदार मिठाईची शतकोत्तर परंपरा असणाऱ्या बसाप्पा हलवाई मिठाई दुकानातील मिठाईस (फराळ) दिवाळीनिमित्त सांगली व मिरज येथील ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. संचालक मयूर चौगुले व नितीन चौगुले म्हणाले की, विविध प्रकारच्या मिठाईसाठी बसाप्पा हलवाई मिठाई दुकानाची ख्याती आहे. मिठाई बनविताना स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगतिले.
मिरजेत लक्ष्मी मार्केट, पंढरपूर रस्ता, तसेच सांगलीतील गावभाग, विश्रामबाग चौक, विजय नगर आणि १०० फुटी रोड येथील शॉपमध्ये उपलब्ध असलेल्या खाजा, पेढा, काजू कतली, म्हैसूरपाक, सोन पापडी, अंजीर काजू कतली, मावा मिठाई, अनारसे, बाकरवडी, मोतीचूर लाडू, बालुशाही, गुलाबजामून, डायट चिवडा, लो कॅलरीज मिठाई यासारख्या विविध प्रकारच्या मिठाईंना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
दीपावली, भाऊबीज व पाडवा या सणांनिमित्त ड्रायफ्रूट बासुंदी, बंगाली मिठाई, फ्रूट खंड, अंजीर बासुंदी, राजभोग, रसगुल्ला, अंगुर मलाई, बदामी व माहिम हलवा अशा सर्वच प्रकारच्या पौष्टिक मिठाई व फराळाचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. प्रियजनांना भेट देण्यासाठी भारतीय पारंपरिक मिठाईचे व ड्रायफ्रूटचे आकर्षक गिफ्ट बॉक्सेस बसाप्पा हलवाईंच्या सर्वच शाखांमध्ये उपलब्ध असून त्यालाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.


