दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरात गुळाचे सौदे उत्साहात पार पडले

0
मुश्रीफ

कोल्हापूर. (प्रतिनिधी) : दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर बाजार समितीत गुळ व भाजीपाल्याचे सौदे उत्साहात पार पडले. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते या व्यवहारांचा शुभारंभ करण्यात आला. गुळ सौद्यामध्ये गुळाचा दर 3700 ते 5050 प्रति क्विंटल इतका नोंदविण्यात आला. यावेळी 55146 गुळ रव्यांची उच्चांकी विक्री झाली. तसेच गुळाचे बॉक्स 3800 ते 4900 प्रति क्विंटल दराने विकले गेले व एकूण 36680 बॉक्स विक्री झाली.

         या कार्यक्रमानिमित्त संतोष ट्रेडिंग कंपनी (कमिशन एजंट) या नवीन भाजीपाला दुकानाचे उद्घाटनही गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी गुळ सौद्यास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट बाजार समितीच्या आवारात आणून विकावा, जेणेकरून योग्य दर मिळेल आणि व्यवहारात पारदर्शकता राहील.” यावेळी उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक प्रकाश देसाई, भारत पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *