दिपावलीमध्ये 8 लाखावर भाविकांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

0
दिवाळी सुट्टी दर्शन भाविकांनी घेतले.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : दिपावलीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या सलग सुट्टयामुळे कोल्हापूर शहर पर्यटक व भाविकांमुळे गजबजून गेले. दिपावलीच्या आठवडयामध्ये 8 लाखावर पर्यटक व भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्याचे मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सागितले.

      कोल्हापूरात भाविकांच्या व पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण शहर दिपावलीमध्ये हाऊसफुल्ल झाले होते. श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दिपावलीचया आठवडयात म्हणजे 18 ते 24 ऑक्टोंबर 2025 या सात दिवसात तब्बल 8 लाख 13 हजार भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले,  कोल्हापूरात पर्यटक व भाविकांना श्री अंबाबाईचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दर्शन रांगेचे योग्य नियोजन केले होते. एआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचेही श्री. दिंडे म्हणाले. याशिवाय देवीच्या मूखदर्शनालाही भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार तसेच चोरीचा प्रकार घडला नसून शांतता व सुरक्षिततेत आणि उत्साही वातावरणात दिपावली काळात भाविकांना देवीचे दर्शन घेता आले.

दिपावलीमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे साधारणत: 8 लाख 13 हजार 684  भाविकांनी दर्शन घेतले. यामध्ये दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी 37 हजार 105, दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी 39 हजार 107, दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी 65 हजार 107, दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी 62 हजार 17, दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी 77 हजार 128, दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 42 हजार 16, दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 91 हजार 206 भाविकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *