निष्ठावंत कार्यकर्त्याचा त्याग आणि नेत्याचं प्रेम..!

0
तासगाव

“कार्यकर्ता असावा पै. श्याम सारखा, कार्यकर्त्यावर जीव लावणारे नेते असावेत काका-बाबांसारखे!”

तासगाव (प्रतिनिधी)

                   तालुक्यातील निमणी येथील पै. श्याम उर्फ अथर्व राजमाने! श्याम हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता..  त्याची आणि काकांची पहिली भेट झाली २००७  साली.. काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसोबत शाम ही न्हाऊन निघाला. त्या वेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो.

             काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली.. संजय काकांच्या हाकेसाठी, घरातल्या एकुलत्या एक बैलांसह, श्यामने स्वतःला बैलगाडीला औताला जुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची परवा न करता ५ किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. त्याचा हा ‘अनवाणी औतासोबत चाललेला’ व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला भिडला.

            आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत, पद-पैसा-सत्ता या मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो!  या कार्यकर्त्याचे निःस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारावले नसते तरच नवलच. काकांच्या आणि बाबांच्या मनात श्यामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली. प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले.

   नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावरचं हे प्रेम पाहून काय सांगावं! धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *