महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास जिल्हा परिषद निवडणूक लढवणार: संदीप गिरी गोसावी (बुवा)
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीत शिये जिल्हा परिषद मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्ग असा आरक्षित जाहीर झाला आहे. याकरिता ग्रामपंचायत माजी सदस्य संदीप गिरी गोसावी ( बुवा) यांनी जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लडविण्याची तयारी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना नेहमीच समाज उपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या श्री. संदिप गिरी यांचा गावच्या विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच अग्रेसर आहेत. बेघर वसाहत व मागासवर्गीय समाजाच्या कार्यासाठी त्यांची आजही लढाई सुरू आहे.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून असलेला अनुभव व जिल्हा परिषद पंचायत समिती यांची संपूर्ण माहिती या जोरावरती निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या वार्डातून व गावातून शिवसेना व भाजप युतीच्या उमेदवारांना नेहमीच लिड मतदान देण्यासाठी प्रयत्न केला आहे. शियेकर ग्रामस्थांच्या जोरावरती शिये जि. प. मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व तसेच संविधान रक्षणासाठी मोदी विचारांचा पाईक म्हणून ते या निवडणुकीस सामोरं जात आहेत.


