निपाणीत क्रांतिवीर संगोळी रायण्णा सर्कल विकासासाठी तीन कोटी 25 लाखाचा निधी

0
WhatsApp Image 2025-10-25 at 5.43.07 PM

निपाणी (प्रतिनिधी) –
निपाणी कोटलगी मार्गावर निपाणी कोर्टाजवळ असलेल्या क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा सर्कलचा विकास करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बाधकाम विभागाचे मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतिश जारकिहोळी यांनी सार्वजनिक विभाग बांधकाम खात्यातून ३ कोटी २५ लाख रूपये मंजूर केले असल्याची माहिती चिकोडी जिल्हा कांग्रेस अध्यक्ष, बुडा अध्यक्ष व धनगर समाजाचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. तसेच शहराला ऐतिहासिक महत्त्व करून देणारा बेळगांव जिल्ह्यातील सर्वात मोठा क्रांतीवर संग्गोळी रायण्णाचा १५ फुटी पुतळा लवकरच अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

निपाणी शासकिय विश्रामधामात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ल्यातून निपाणीत प्रवेश करताना पहिलाच असणारा सर्कलचे क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा नामकरण झालें आहे. या ठिकाणी भव्य पुतळा निर्माण करण्याची आमच्या धनगर समाजाची अनेक वर्षाची मागणी होती. याप्रकरणी जिल्हा पालकमंत्री सतिश जारकिहोळी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २२ सष्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत याप्रकरणी मान्यता देवून या सर्कलच्या विकासासाठी ३ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून या ठिकाणी पूर्ण रस्ता पूर्ण रस्ता विकसीत करून चांगल्या प्रकारचे सर्कल निर्माण करण्यात येणार आहे. तसेच चबुतराही निर्माण करण्यात येत आहे. या कामाचा आराखाडा बनवित येत असून १५ दिवसात टेंडरचे काम पूर्ण करून महिनाभरात कामाला सुरूवात होवून दोन ते तीन महिन्यात काम पूर्ण होइल.

तसेच या ठिकाणी ३६ लाख रूपये खर्चातून १५ फुटी संग्गोळी रायण्णाचा पुतळा उभारण्यात येणार असून पुतळा निर्माण कामालाही प्रारंभ करण्यात आला आहे. हा पुतळा राज्यातील सर्वात मोठा पुतळा ठरणार असून निपाणी भागाच्या इतिहासातील पैतासिक क्षण ठरणार आहे. हे काम पुढील वर्षीच्या ऑगष्ट ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करून बेळगांव हिवाळी अधिवेशनच्या काळात मुख्यमंत्री सिध्दरामय्या याच्या हस्ते पालकमंत्री सतिश जारकिहोळी व मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात येणार असल्याचे सांगून या कामी पीडब्ल्यूडीचे सेक्रटरी सत्यनारायण व अधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

निपाणी धनगर समाजाचे अध्यक्ष आर. के. धनगर म्हणाले, हे पुतळा उभारण्याचे गेल्या ३५ वर्षाचे स्वप्न होते. या अगोदरही आपण लक्ष्मणराव चिंगळे, कै. पत्रकार मनोहर बन्ने, डी. एन. बन्ने व इतरांनी मोठे प्रयत्न केले होते. पण आज लक्ष्मणराव चिंगळे यांच्यामुळे यश आल्याचे सांगितले. महादेव कौलापुरे यांनी निपाणीबरोबर वाळकी येथे २५ लाख रूपयांतून पुतळा उभारणीचे काम सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी माजी जि.पं. सदस्य सिध्दू नराटे, हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने, राहुल ढोणे, सिद्राम पुजारी, सिंध्दलिंग पुजारी, एस. के. दिवटे, एम. वाय. गोकार, मल्लाप्पा बन्ने, रेवण्णा पुजारी, आर. ए. बन्ने, संतोष हेगडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *