पोलिओ संपवण्याचा निर्धार- जिल्ह्यात सांगली रोटरी परिवारातर्फेतर्फे जनजागृती रॅली उत्साहात

0
IMG-20251028-WA0019

मिरज (प्रतिनिधी)
पोलिओचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली ,सांगली मिड टाउन आदी क्लबच्या सदस्यांनी एकत्र येऊन पोलिओ अवेअरनेस रॅली चे विश्रामबाग चौक ते राम मंदिर या मार्गावर आयोजन केले होते. ही सायकल/ टू व्हीलर रॅली क्रांतिसिंह नाना पाटील चौक, विश्रामबाग येथून सुरू होऊन कर्मवीर चौक मार्गे राम मंदिर चौक येथून पुन्हा विश्राम बाग येथे येऊन संपन्न झाली. रॅलीमध्ये समाविष्ट रोटरी सदस्यांनी यावेळी विविध बॅनर, घोषणा द्वारे लोकांचे लक्ष आकर्षित केले.

यावेळी रोटरी सहाय्यक प्रांतपाल धर्मेंद्र खिलारे, पदाधिकारी डॉ सुहास जोशी, रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली चे अध्यक्ष उदय कुलकर्णी, सचिव प्रफुल्ल तारळेकर ज्येष्ठ सदस्य प्रमोद चौगुले, राजेंद्र मेढेकर, विनोद पाटील, राजन राजोपाध्ये, विनायक काळे, आर डी जाधव, गणेश पाटील, संदीप नाईक, प्रवीण गोडबोले, तसेच , विलास सुतार, राजा प्रभुणे, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटावूनचे सचिव सुधीर मेत्रे ,प्रशांत घोडके, आशय नंदेश्वर, राजेश तूंगे, संतोष साखरे राजेंद्र लंबे , सचिन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *