जनता दल (सेक्युलर) जि. प. सह सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढविणार

0
1000780828

मिरज (प्रतिनिधी)

सांगली जिल्हा जनता दल पदाधिकारी यांची बैठक मिरज येथील संपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी राज्य प्रवक्ता, व महापालिका अध्यक्ष डॉ. जयपाल चौगुले मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जिथे आवश्यक तेथे स्वबळावर तर आवश्यक त्यां ठिकाणी मित्रपक्षांसोबत युती करून लढविणार असल्याचे सांगितले. या वेळी जि. प. गट निहाय आणि महानगरपालिका प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला.

त्यामध्ये पक्षाच्या काहीं इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघाचा, प्रभागाचा दौरा पूर्ण करून व्यापक पाठिंबा मिळविला असल्याचे सांगून आपल्या विजयाची हमी दिली.त्यानुसार सुकाणू समितीद्वारे याचा सर्वे करून प्रदेश कार्यालयाला अहवाल पाठविणार असल्याचे यावेळी राज्य सचिव प्रेमचंद पांड्याजी यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष ऍड. फैयाज झारी म्हणाले की, आगामी पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने मतदार नोंदणीची मोहीम सुरु करून आपल्या पक्षांमार्फत उमेदवार निश्चित करून त्याच्या विजयासाठी आवश्यक ते धोरण आखावे. यावेळी प्रामुख्याने उपाध्यक्ष संजय ऐनापुरे, महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष ऍड. शब्बीर आलासे, स्व. शरद पाटील यांचे नातू श्री प्रणव पाटील,शशिकांत गायकवाड, जनार्धन गोंधळी,ज.द.अल्पसंख्यांक सेल प्रमुख श्री सुलेमान आलासे,निराधार पेन्शन संघटनेचे किराड अंकल, हुसनाप्पा छलवादी, प्रसिद्धी सहाय्यक इरफान मोमीन, रेस्टोरंट संघटनेचे सचिव तथा अर्थमुव्हर्स श्री प्रशांत अग्रवाल, श्याम कांबळे,त्रिदल वाघमारे, राजू वड्यापन,वैभव कोलप,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *