विकास हा आमचा संकल्प ; त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आ. डॉ. सुरेश खाडे

0
suresh khade

मिरजत ७ प्रभागांच्या विकासासाठी २४ कोटीहून अधिक निधी

मिरज (प्रतिनिधी)

मिरज शहराच्या तसेच गामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. परिपूर्ण विकास हा आमचा संकल्प असून यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी माहिती आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकत दिली. मिरज शहरातील प्रभाग क्र. २,३,४,५,६, ७ तसेच २० या प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन गेल्या काही काळात पार पडली आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या ७ प्रभागात एकुण २४ कोटी ६९ लाख ७ हजार इतक्या निधी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आला आहे. तसेच सन-२०२५-२६ या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभाग निहाय एकुण१० कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असुन सदरील कामे लवकरच मंजुर होतील अशी माहिती आ. डॉ. खाडे यांनी पत्रकर बैठकीत दिली.

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे म्हणाले, मिरज ग्रामीण भागातील ४५ गावामध्ये एकुण १०९ कोटी २९ लाख ९९ हजार इतका निधीची विकास कामे सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षात करण्यात आली असुन तसेच सन-२०२५-२६ या आर्थिक वर्षांत ग्रामीण भागात गाव निहाय एकुण २७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी विकास कामे प्रस्तावित आहेत.

ते पुढे म्हणाले, अपघातग्रस्त शेतकऱ्यांनाही गोपीनाथ मुंडे अपघात मदत देण्यात आली. यामध्ये कै. विनोद विलास निळकंठ यांचे नातेवाईक श्रीमती. सुनिता विनोद निळकंठ (कवलापूर) यांना २ लाख, कै. रामराव हिंदुराव सावंत यांचे नातेवाईक श्रीमती मीना रामराव सावंत (कवलापूर) यांना २ लाख, कै. बाळासाहेब शिवाजी सावंत यांच्या नातेवाईक श्रीमती. मनिषा बाबासाहेब पाटील (कानडवाडी) २ लाखांची मदत तसेच कै. माणिक बाबु बने (मालगाव) यांच्या नातेवाईकांना श्रीमती शकुंतला माणिक बने (मालगाव) यांना २ लाख रुपये, कै. सागर आण्यासो नांदे यांचे नातेवाईक श्रीमती सुषमा सचिन नांद्रे ( मालगाव) २ लाख रुपये तसेच कै. सचिन विलास माळी यांच्या नातेवाईकांना २ लाख आणि दिलीप मारुती पाटील याना १ लाखांची मदत दिल्याची माहिती आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *