सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर करा

0
WhatsApp Image 2025-10-31 at 6.52.18 PM

सांगली, प्रतिनिधी

      सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा 7/12 कोरा करणे आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्या घेवून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तत्काळ स्थगिती द्या अशी आग्रही मागणी केली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या उपोषणात सहभागी झाले.

     यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बोलताना आवाहन केले की, सांगली जिल्हयामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपीकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सांगली जिल्हयातील शेतकरी मोठया अडचणीत सापडला असून त्याचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अशावेळी सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा 7/12 कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे. राज्य शासनाने वेळकाढूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करणेबाबत निर्णय घ्यावा.

    ते पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढया व बँकामधून कर्जे घेत असतात, परंतु शेती पीकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्जे भरणे शक्य होत नाहीत. सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतीपीकाचे नुकसान होवूनही कर्ज वसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. याकरिता यावर उपाय म्हणून जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे.

त्याकरिता या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून खालील मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी विनंती मा. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्य शासनाला केल्या.शेतकऱ्यांच्या मागे लागणार नाही.

अशा वरील सर्व मागण्या तात्काळ पुर्ण करणेकरिता शेतकऱ्यांच्यावतीने सदर निवेदन जिल्हाधिकारी यांचेकडे  सादर करण्यात आले

    यावेळी संजयकाका पाटील, प्रभाकर बाबा पाटील,चंद्रकांत कदम, प्रमोद शेंडगे, दिग्विजय पाटील, सुखदेव पाटील, गजानन कुल्लोळी, सुनिल पाटील, विक्रम पाटील, सुनिल जाधव, महादेव पाटील, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, ईश्वर व्हनखंडे, नामदेव पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

           सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा 7/12 कोरा करणेत यावा.गेल्या मे महिन्यापासून सांगली जिल्हयामध्ये सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहे. कोणत्याही प्रकारचे शेतीपीक शेतकऱ्यांच्या हाताला लागलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणेबाबतच्या दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 रोजी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार जिल्हयातील सर्व बँक व पतसंस्था यांच्याकडून जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या कर्ज वसुलीस तात्काळ स्थगिती देणेबाबतचे संबंधिताना आदेश व्हावेत.

दि30 ऑक्टोंबर 2025 रोजी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार शेतकऱ्यांना दि. 30 जून 2026 पुर्वी कर्जमाफी देणेबाबत निर्णय घेण्यात आला असून हा काळ जास्त आहे. शेतकऱ्यांचे सद्य परिस्थितीला नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान झालेने त्यांना कोणत्यांही प्रकारचे आर्थिक स्थैर्य राहिलेले नसून कर्जमाफी देणेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. तसेच जेथे जेथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपुर्ण पीक वाया गेलेले आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर जास्तीत जास्त आर्थिक मदत किंवा कर्जमाफीचा निर्णय प्राथमिकतेने घ्यावा.शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबतचा अहवाल शासन स्तरावरील गठीत करण्यात आलेल्या समितीकडून लवकरात लवकर प्राप्त करुन त्यावर मार्च २०२६ च्या आधी कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बँका पतसंस्था सोसायट्या यांचा कर्जवसुलीसाठी तगादा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *