मिरजेतील कन्या महाविद्यालयात ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
मिरज (प्रतिनिधी)
दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव राजू झाडबुके व प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. अनुराधा गोरे-पवार यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.
यानिमित्त राज्यशास्त्र, इतिहास व मानसशास्त्र विभागांतर्फे ‘माझे महाविद्यालय’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ आणि ‘लोकमान्य टिळक : जीवन व कार्य’ या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ३५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका नलिनी प्रज्ञासूर्य, डॉ. गंगाधर चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. नियोजन डॉ. शबाना हळंगळी, प्रा. अभिनव औरादकर, प्रा. शर्वरी कांबळे व प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले.


