विभागीय जलतरण स्पर्धेत रयत शाहू कॉलेज तृतीय
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) यांचे प्रोत्साहन लाभले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय जलतरण स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावात संपन्न झाल्या. ह्या स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस किरण माने, ओंकार सत्यवान पाटील, ऋषिकेश कमलाकर पाटील, रामदास बाळासो आडुळकर यांनी बटरफ्लाय, फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक व ब्रेस्टस्ट्रोक ह्या जलतरणच्या सर्व प्रकारात चमकदार कामगिरी करीत शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण सांघिक तृतीय क्रमांक चॅम्पियनशिप प्राप्त केली.
महिला व पुरुष ह्या दोन्ही गटात संपन्न झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ जलतरण निवड कमिटी चेअरमन प्रमुख पाहुणे डॉ. सुनील खराडे यांच्या शुभहस्ते झाले. ह्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले, जलतरण निवड कमिटी सदस्य डॉ. एम. आर. पाटील, कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषदेचे सेक्रेटरी डॉ. निलेश पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या ह्या स्पर्धेत महाविद्यालयाच्या तेजस किरण माने याने १०० व २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात द्वितीय क्रमांक व प्रथम क्रमांक मिळविला. ओंकार सत्यवान पाटील याने ४००, ८०० व १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात अनुक्रमे द्वितीय, प्रथम व प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ऋषिकेश कमलाकर पाटील याने बॅकस्ट्रोक व ब्रेस्टस्ट्रोक ह्या दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्याने बॅकस्ट्रोक प्रकारात ५०, १०० मीटरमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला तर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ५० व १०० मीटरमध्ये अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केला. तेजस किरण माने, ऋषिकेश कमलाकर पाटील, ओंकार सत्यवान पाटील, रामदास बाळासो आडुळकर ह्या विद्यार्थ्यांनी ४ x १०० रिलेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवाजी विद्यापीठ जलतरण निवड कमिटी चेअरमन डॉ. सुनील खराडे व डॉ. एम. आर. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांचे प्रोत्साहन लाभले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. गणेश लवंगारे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे, प्रा. सविता माजगावकर, प्रा. समाधान बनसोडे, स्विमिंग कोच मानसिंग पाटील, अंकुश पाटील, संतोष डोकरे, अमर पाटील व सर्व जलतरण तलाव स्टाफने विशेष परिश्रम घेतले.


