शेतीच्या परिवर्तनासाठी माणसामध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता – डॉ. अविनाश पोळ

0
सत्यमेव जयते फार्मर कप’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

सत्यमेव जयते फार्मर कप’ जिल्ह्यास्तरीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर  (प्रतिनिधी):ग्रामीण भाग हा शेती व शेतीविषयक व्यवसायावर अवलंबून असल्याने, शेतीच्या विकासाशिवाय ग्रामीण भागात समृद्धी साधणे शक्य नाही. त्यासाठी शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. यासाठी केवळ अनुदानित निविष्ठा आणि प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन माणसामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण आणि मार्गदर्शनात प्रामुख्याने गुंतवणूक केली पाहिजे, असे मत पाणी फाउंडेशन कार्यवाह डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.

      शाहू स्मारक भवन येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यशाळेस अनिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिदे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

      शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक शेती करणे काळाची गरज असल्याचे सांगून पाणी फाउंडेशन कार्यवाह डॉ. अविनाश पोळ म्हणाले की, सध्या ‘फार्मर कप’ महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात याचा विस्तार करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेती विकासाठी जनचळवळ उभी राहील आणि ग्रामीण भागाची समृद्धी साधता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व गावांमध्ये ही स्पर्धा राबविली जात आहे. त्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व पाणी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

      अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी यावेळी शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, एआय चा वापर करून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. सन २०२२ पासून पाणी फाउंडेशनने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ उपक्रमाद्वारे संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत ५०,००० हून अधिक शेतकऱ्यांवर याचा चांगला परिणाम झाला असून, त्यातील निम्म्या संस्था महिला शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे हे व्यासपीठ महिला सशक्तीकरणासाठीही प्रभावी ठरले आहे. 

      यावेळभ्‍ विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी आणि  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनीही अपले विचार व्यक्त केले. प्रारंभी कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी कार्यक्रमाचे स्वागत करुन प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यातील शेतीच्या विकासाला पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून चालना मिळेल आणि त्यासाठी पुढील एकत्रित वाटचालीचा मार्ग मोकळा होईल. यामुळे आधुनिक शेतीची नवी जोड शेतकऱ्यांना मिळेल. या कार्यशाळेस कृषी विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *