राष्ट्रीय महामार्ग १६० च्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी तब्बल २८३.४९ कोटी निधी मंजूर
आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश
मिरज (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० च्या मिरज मतदारसंघातून जाणाऱ्या २७.५७० किमी. रस्ते कामांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी तब्बल २८३.४९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी या संदर्भात ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच या कामांची सुरवात होईल असे आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथून बोलताना सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० हा सिन्नर-शिर्डी-अहमदनगर-दौंड-दहिवडी-विटा-तासगाव-मिरज- म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जातो. यातील मिरज मतदारसंघातील काकडवाडी-मिरज-म्हैसाळ- कर्नाटक बॉर्डर या २७.५७० किमी. रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा यासाठी मिरजेचे आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा सुरु ठेवला होता. या रस्त्यांचे काम झाल्याने या भागातील दळणवळण वाढीस चालना मिळणार आहे.


