कुकटोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती महेश देसाई बिनविरोध

0
kavathemahankal desai

सांगली (प्रतिनिधी)

कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. स्वाती महेश देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच तानाजी यमगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकारी शहाजी खोत यांनी कामकाज पाहिले.

गेल्या महिन्यात माजी उपसरपंच शेवंता गुंडा चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर गुरुवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत सौ. स्वाती देसाई यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या निवडीबाबत ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या कामकाजात महिलांचा वाढता सहभाग ही एक सकारात्मक बाब असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.

निवडीनंतर सौ. देसाई यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामपंचायतीचे सदस्य, अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.

यावेळी माजी सरपंच शिवाजी कारंडे सर, प्रशांत देवकते, प्रा. सुनील तोरणे, प्रा. वैष्णवी तोरणे, विद्या उत्तरे, लता बोराडे, कल्पना चौगुले, रावसो पाटील, राजाराम पाटील, रघुनाथ वाघमोडे, डॉ. सुधीर खाडे, संतोष बंडगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *