खरशिंगमध्ये तरुणाची आत्महत्या ; कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद
सांगली (प्रतिनिधी)
खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरशिंग येथील सौरभ बाबासाहेब मलमे (वय २२) या तरुणाने राहत्या घरात तुळीला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची फिर्याद सुनिता सुभाष मलमे (वय ३५, रा. खरशिंग) यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.


