ट्रान्सफर फोडून कॉपरची चोरी
खुपिरेतील विठ्ठल पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफर चोरट्यानी फोडला
कोपार्डे,(प्रतिनिधी) खुपिरे येथील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफॉर्मर रात्री चोरट्यानी फोडला. यातून कॉपर, व साहित्याची चोरी केली. ट्रांसफार्मर फोडल्यामुळे २०० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
खुपिरे येथील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेची जॅकवेल भोगावती नदीच्या काठावर आहे. येथे जॅकवेल जवळ संस्थेच् ट्रान्सफॉर्मर होता. चोरट्यांनी रात्री वीज पुरवठा करणारी केबल कट करून ट्रान्सफॉर्म फोडला आहे. यातील सुमारे साडेतीनशे लिटर ऑइल सोडून देण्यात आले आहे. या ट्रान्सफॉर्मर मध्ये २२ किलोच्या बारा कॉइल होत्या.
यातून चार लाखाची कॉपरची चोरी केली, सुमारे ६० हजार चे ऑइल होते, मजुरी असा सर्व खर्च पाच लाखाचा संस्थेवर पडला आहे. हंगाम सुरू झाला असून उसाला पाण्याची मागणी होत असताना चोरी झाल्यामुळे २०० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी याबाबत करवीर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस विजय तळसकर, अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा पाटील, संचालक सर्जेराव पाटील, बळवंत पाटील, सचिव प्रकाश कुंभार उपस्थित होते.


