राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेत यश
कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेजचा इयत्ता अकरावी ची सायन्सचा विद्यार्थी वाहिद दस्तगीर मुकादम यांचा काव्यलेखन प्रकारात तृतीय क्रमांक आला.
त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या चेअरमन सौ संगीता प्रशांत पाटील, सदस्य प्रशांत पाटील, प्राचार्य प्रो डाँ. डी. आर. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम गायकवाड, उपप्राचार्या सौ. एल. बी चव्हाण यांनी अभिनंदन केले.
तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ज्योती अनिल कांबळे, इयत्ता अकरावी सायन्स च्या वर्गशिक्षिका प्रा. संयोगिता पाटील, प्रा. रणजीत राणेसंकपाळ यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.


