शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन ) या क्रीडा प्रकारात रयतचे शाहू कॉलेज द्वितीय

0
शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत २१ किलोमीटर

शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन ) या क्रीडा प्रकारात रयतचे शाहू कॉलेज द्वितीय 

कोल्हापूर.(प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रवीण बबन कांबळे ह्या विद्यार्थ्यांने २१किलोमीटर (हाफ मॅरेथॉन ) या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करून तो अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रवीण हा महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. ह्या स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक येथे पार पडल्या. 

      प्रवीणला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *