पाणी गुणवत्तेत सांगली जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर करणार :-सीईओ विशाल नरवाडे
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषद पाणी गुणवत्तेबाबत राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व उपाय योजना करण्याचा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशाल नरवाडे (भा.प्र.से.) यांनी दिल्या ते जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
जिल्हा परिषद, सांगली येथे जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीची सभा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशाल नरवाडे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३ नोव्हेंबर रोजी पार पडली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता विषयक कामांचा विस्तृत आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. सभेला प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन), कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल), उपअभियंता (यांत्रिकी व देखभाल दुरुस्ती विभाग) ,जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा प्रमुख आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सल्लागार उपस्थित होते.
तालुका स्तरावर प्रत्येक महिन्यात पाणी गुणवत्ता बैठक आयोजित करून पाणी गुणवत्ता संदर्भातील कामकाजाची अमलबजावणी योग्यरीत्याकरून त्याचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर करण्याच्या सूचना प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन), श्री. किरण सायमोते यांनी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रमुख सूचना व महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा भूजल प्रयोगशाळेसाठी जागा उपलब्धता: जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा भूजल प्रयोगशाळेसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.ईश्वरपूर उपविभागीय प्रयोगशाळा त्वरित सुरू करणार: ईश्वरपूर येथील उपविभागीय प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले.नियमित पाणी नमुन्यांबाबत माहिती: पाणी नमुने (Water Samples) आणि टी.सी.एल. (TCL) नमुन्यांच्या स्थितीबाबत कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि काटेकोरपणे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दूषित पाणी नमुन्यांवर तातडीने कार्यवाही: दूषित आढळलेल्या पाणी नमुन्यांमागील कारणांची मिमांसा (Root Cause Analysis) शोधून, त्यावर कोणत्याही दिरंगाईशिवाय 24 तासात कार्यवाही करण्याचे निर्देश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘चंदेरी कार्ड’ वाटपजिल्ह्यात पाणी गुणवत्तेचे उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ज्या ग्रामपंचायतींनी सलग पाच वर्षे ‘हिरवे कार्ड’ (Green Card) प्राप्त केले आहे आणि ज्यांच्या कार्यक्षेत्रात पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची साथ (Waterborne Disease Outbreak) उद्भवलेली नाही, अशा ग्रामपंचायतींची माहिती एकत्रित करण्याचे आदेश देण्यात आले.
चौकट ….
पाणी गुणवत्ते मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना लवकरच ‘चंदेरी कार्ड'(Silver Card) देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशाल नरवाडे (भा.प्र.से.) यांनी सांगितले.या निर्णयामुळे ग्रामपातळीवर पाणी गुणवत्ता जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि ग्रामपंचायतींचे मनोबल वाढणार असून, ‘शुद्ध पाणी, सुरक्षित जीवन’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे.


