राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या श्रेयस गायकवाड ची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
श्रेयसच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी श्रेयसचे अभिनंदन केले.
कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत विभागस्तरीय 19 वर्षाखालील कबड्डी सामन्यांचे आयोजन ओरस येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेत घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज चा इयत्ता 12 वी मध्ये शिकत असणारा खेळाडू श्रेयस विनोद गायकवाड याची वाशिम येथे दि. 18 ते दि.20 तारखेदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड चाचणीसाठी निवड झाली.
त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या चेअरमन सी संगीता प्रशांत पाटील, सदस्य प्रशांत पाटील, प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड, उपप्राचार्या सौ.एल.बी चव्हाण यांनी अभिनंदन केले.
तर खेळाडूस प्रा. संजय सिताप, वर्गशिक्षक प्रा.सतिश यादव, क्रीडा शिक्षक प्रा.रणजीत राणेसंकपाळ, प्रा.एम.डी. पाटील, प्रा. स्नेहा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


