हवालदार इब्राहिम अरभावी यांना दोन कांस्य पदक; चेन्नई येथे झालेल्या एशियाई स्पर्धेत दिमाखदार यश

0
ibrahim

मिरज (प्रतिनिधी)
गुन्हे अन्वेषण शाखा, लोहमार्ग पुणे, युनिट मिरज येथील हवालदार इब्राहिम अरभावी यांना चेन्नई येथे झालेल्या एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कांस्यपदके प्राप्त झाली. या कामगिरीबद्दल लोहमार्ग पोलीस दल तसेच क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांची साऊथ कोरिया येथे सन २०२६ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली.

स्पर्धेत लांब उडी, ११० मीटर अडथळ्यांची शर्यत या दोन क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना कांस्यपदके मिळाली आहेत. या स्पर्धेत २२ देशांमधील सुमारे ३ हजार ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. इब्राहिम अरभावी मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे सराव करतात. पुणे लोहमार्ग पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पुणे लोहमार्ग एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *