मनपा जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेज विजयी
या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने आयोजित कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय 19 वर्ष मुली डॉजबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील डॉजबॉल संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये अंतिम सामना नागोजी पाटणकर हायस्कूल, कोल्हापूर यांच्या संघासोबत झाला. अंतिम सामन्यांमध्ये कमला कॉलेजने आठ गुणांच्या फरकाने विजेतेपद पटकावले. कमला कॉलेजच्या डॉजबॉल संघामध्ये कर्णधार मनाली कांबळे, संचिता सावंत, वैभवी येडूरकर, प्रणाली ढाले, स्मिता वासुदेव, दक्षता कामिरे, वैष्णवी जाधव, श्रुती चौगुले, राजनंदिनी वागवेकर, तन्वी जाखले या खेळाडूंचा समावेश होता. कोल्हापूर विभागीय डॉजबॉल स्पर्धेसाठी कमला कॉलेजच्या डॉजबॉल संघाची निवड झाली आहे.
या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.


