जन्म-मृत्यूचे दाखले पूर्ववत ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

0
1000848553

मिरज (प्रतिनिधी)
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका मिरज कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले मिळण्यासाठी प्रचंड विलंब लागत असून नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अपुरे व नवीन कर्मचारी आणि ऑनलाईन प्रणाली बंद असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत, परगावातून, कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर व मोहन वाटवे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बोलताना आयुक्त गांधी यांनी सांगितले कि, लवकरच ऑनलाईन आयएफएसओ प्रणाली सुरु करण्यात येणार असून नागरिकांना होणार त्रास बंद होईल. हि नवीन प्रणाली सुरु केल्यावर नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले स्वयंचलित मशीनद्वारे देखील मिळू शकतील असे आश्वासन आयुक्त यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *