राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत बेडगच्या पियुष क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश
मिरज (प्रतिनिधी)
आर्य अबॅकस अँण्ड वेदिक मॅथ्स असोसिएशनतर्फे सातारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये पियुष क्लासेस बेडगच्या विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन केले.यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे मानकरी सेकंड लेव्हलला विश्वजीत पाटील तर फोर्थ लेव्हलला असद मुल्ला ठरले. त्यांना सायकल बक्षीस मिळाली. चॅम्पियनचे मानकरी फर्स्ट लेव्हल श्रीवर्धन पाटील, थर्ड लेव्हल तोहा शेख, फोर्थ लेव्हल विराट निलेश घोरपडे, सिक्स्थ लेव्हल वाजीद मुल्ला ठरले. यासर्वांना स्मार्ट वॉच बक्षीम म्हणून मिळाले.
बेसिक लेवल मध्ये वरद चौगुले द्वितीय, रिदा शेख तृतीय तसेच मास्टर जुनियर लेव्हल मध्ये रईसा गवंडी प्रथम, शिवांश सानप व स्वरा पाटील तृतीय, अथर्व वडगावे चतुर्थ आणि सेकंड लेव्हल मध्ये सायली प्रवीण घोरपडे द्वितीय, आदित्य माने चतुर्थ आले. फोर्थ लेव्हल मध्ये पायल भारत घोरपडे प्रथम, चिन्मय पाटील तृतीय स्थानी राहिले. एट्थ लेव्हल मध्ये मानसी दत्तात्रय पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकवाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस, ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र अशा स्वरूपात पारितोषीक देण्यात आले. उर्वरीत विद्यार्थ्यांनीही अगदी कमी वेळेत 100 गणिते सोडविली. त्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
पायल घोरपडे, मानसी पाटील व असद मुल्ला यांनी आठही लेव्हल पूर्ण केल्या. त्यांना ग्रेड्युएशन इन अबॅकस कंप्लिटेड स्टुडन्ट अवॉर्ड देण्यात आला. बेडग शाखेच्या शाखाधिकारी रंजना सूर्यवंशी यांना बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेडग मध्ये पोहचताच बेडगचे लोकनियुक्त तत्पर सरपंच उमेश पाटील यांनी भेटून सर्वाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बेडग शाखेच्या शाखाधिकारी रंजना सूर्यवंशी म्हणाल्या सर्व विद्यार्थी यांनी यासाठी खुप केलेली प्रॅक्टिस, क्लासला वेळेत येणे याचे यश त्यांना मिळाले आहे. विद्यार्थ्यांना शाखाधिकारी रंजना सूर्यवंशी, ऐश्वर्या, वैष्णवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.


