शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेस ग्रामस्थांचा तीव्र विरोध
सरूड. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या शेताला पाण्यासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प राबवला आहे. त्याप्रमाणे शाहूवाडी तालुक्यात शिंपे येथील गायरान जमिनीत हा प्रकल्प मंजूर झाला आहे. परंतु गावाला गायरान जमीन कमी असल्याने हा गाव पूर नियंत्रित कक्षात असल्याने पूर परिस्थिती वेळी गावच्या स्थलांतराला या गायराना व्यतिरिक्त जागा उपलब्ध नसल्याने सदर होणाऱ्या सौर सौरवीज प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध करत प्रकल्प उभा न करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजने अंतर्गत शाहूवाडी तालुक्यांमध्ये चार ठिकाणी प्रकल्प उभारणीस मंजुरी मिळाली आहे यामध्ये शिंपे येतील 794 गट क्रमांक मधील गायरानात शासनाने या प्रकल्पाविषयी कोणतीही पूर्वकल्पना न देता या गट नंबर मध्ये प्रकल्पाला मंजुरी देऊन प्रतीक्षात कामाला सुरुवात केली असता सर्व गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवत हा प्रकल्प इथे उभा राहिल्यास गावाला गायरान कमी असल्याने या गावातील सर्व क्षेत्र पूरग्रस्त क्षेत्र आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावकऱ्यांचे पुनर्वसन करणार कोठे असा मोठा प्रश्न गावक-यांसमोर आहे.
येथील शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करत असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी या गायराना व्यतिरिक्त दुसरीकडे जागा नसल्याने या गावच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन हा होणारा प्रकल्प अन्यत्र हलवावा या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ तीव्र विरोध करत गावातील ग्रामसभा बोलून ग्रामसभेत सभेत एकमताने विरोधाचा ठराव घेऊन हा प्रकल्प थांबवण्यासाठी न्यायालय देखील धाव घेतली आहे. तेथे लढा चालू आहे. तरी शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रकल्प अन्यत्र हलवावा अन्यथा सर्व गाव तीव्र आंदोलन करेल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.


