विद्यार्थी उच्च पदावर पोहोचतो तोच शिक्षकांच्या आनंदाचा व कर्तव्यपूर्तीच्या क्षण असतो:- जिल्हाधिकारी अशोक काकडे
कॉपी दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा हे अभियान सुरू:- शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे
सांगली प्रतिनिधी
शिक्षकांचा आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो तो होय हाच यशाचा मापदंड असतो विद्यार्थी तसेच वयानुरूप एखाद्या विषयाची आवड हा शिक्षकच निर्माण करू शकतो एखादा आपला विद्यार्थी उच्च पदावर पोहोचतो तोच शिक्षकांच्या आनंदाचा व कर्तव्यपूर्तीच्या क्षण असतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत एसएससी वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या साठी जिल्हा परिषद सांगली आयोजित इयत्ता दहावीच्या इंग्रजी गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन राजेसाहेब लोंढे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी केले या इयत्ता दहावी करता फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता काय उपाययोजना कराव्या लागतील सत्र परीक्षेचा वरील तीन विषयांचा निकालाचा उहापोह करून सर्व उपस्थित विषय शिक्षकांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिकवणे हे खरे शिक्षकांचे कौशल्य आहे हे कौशल्य जागृत करा आणि ध्येय मोठे ठेवा इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकाल लावून एक वेगळा एक सांगली पॅटर्न तयार करूया आणि त्यासाठी प्रयत्न करूया या प्रसंगी त्यांनी कॉपी दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा हे अभियान सुरू केल्याचे जाहीर केली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे दिली.
सत्र परीक्षा झिरो ते दहा इतके कमी गुण प्राप्त विद्यार्थ्याकरिता उदबोधन वर्ग मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जावेत याची कार्यवाही येत्या तीन महिन्यात करण्यात येईल अशी ग्वाही दिली अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण करून त्यास आपुलकीने समजावून सांगितले जावे याप्रसंगी सांगली आणि परिसरातील विविध हायस्कूल मधील शिक्षकांनी आपल्या शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम सांगितले
याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनी मार्गदर्शन केले पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री रसाळ सर यांनी स्वागत केले श्रीपाद कुलकर्णी सर यांचा सत्कार माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी तर प्रकाश जाधव निवृत्त आरटीओ यांचाही सत्कार करण्यात आला.शेवटी पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक रसाळ सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


