भाजप नेते सुशांतदादा खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
मिरज (प्रतिनिधी)
भाजपचे युवानेते, माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र सुशांतदादा खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मिरजेतील मनपाच्या आस्था महिला बेघर केंद्रात असणाऱ्या महिलांना ब्लँकेट्स व फळे सुशांतदादा खाडे यांच्या शुभहस्ते वाटण्यात आली. तसेच मिरजेतील शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डात दाखल असणाऱ्या रुग्णांना, महिलांना, लहान बालकांना ब्लँकेट्स आणि फळे याचे वाटप करण्यात आले.
पार्श्वनाथ नगर येथील प्राणीमित्र अशोक लाकडे यांच्या गोशाळेत चारा प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर शहरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम याठिकाणी कार्यकर्त्यांनी फळे, बिस्किटे यांचे वाटप केले गेले. या सर्व उपक्रमांमध्ये भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, महिला व युवा पदाधिकारी,विविध मोर्चा व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुशांतदादा खाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मिरजेतील जनसंपर्क कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी नगरसेवक, विविध संघटनांचे व संस्थांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती.


