कुंभी बँकेचा सहकाराला साजेसा कारभार : नामदार हसन मुश्रीफ
कुंभी बँकेच्या आठव्या शाखेचे उद्घाटन
कोपार्डे.(कोल्हापूर) कुंभी कासारी सहकारी बँकेने उत्कृष्ट कामकाज करत राज्यात नावलौकिक केले असून लवकरच ती राज्यात प्रथम क्रमांकाची बँक ठरेल. जिल्हा बँक, सहकारी बँकेतून शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे. कर्जमाफी नंतरही शेतकरी कर्जबाजारी होतात, व आत्महत्या करतात अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास करून कर्जमाफी चे नियोजन केले जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कुंभी बँकेच्या आठव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, बँकेचे अध्यक्ष अजित नरके प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नामदार मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेतून साखर कारखानदारांना कर्जे दिली, यामुळे जिल्ह्यात एफ आर पी चा एक रुपया थकला नाही, साखर कारखाने टिकले तर शेतकऱ्यांचे भले होणार आहे. असे सांगून आम्ही जिल्हा बँकेचा कारभार करताना राजकीय पादत्रांने बाहेर काढून काटकसरीचा कारभार केला आहे.त्यामुळे जिल्हा बँक उत्कृष्ट पातळीवर असून बँकेला देशात उत्कृष्ट आणण्याचा आमचा मानस आहे. कर्जमाफी वर बोलताना लाखाचे सव्वा लाख कसे शेतकऱ्यांना देता येईल हे पाहणार आहोत.
गोकुळ वर बोलताना डीबेंचरचा प्रश्न दिवाळीला पुन्हा उद्भवता कामा नये, डीबेंचरचा बाबत अहवाल तयार करून संस्थांना देणार आहोत आणि संस्था सांगतील त्या पद्धतीने काम केले जाईल असे सांगून गोकुळ मध्ये २५ लाख दूध लिटर संकलन करून कैलासवासी आनंदराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करणार आहोत.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हा बँक, व सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी तसेच राज्याचा विकास झाला आहे. मात्र केंद्राकडून यावर निर्बंध येत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी उद्घाटन झाल्याचे जाहीर करून २०० कोटीचा ठेवीचे उद्दिष्ट असल्याचे सांगून प्रगतीचा आढावा सांगितला.
यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिंचेकर, गोकुळचे अध्यक्ष नाविक मुश्रीफ ,संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे ,एस आर पाटील, भैयाजी शेळके, सर्जेराव पाटील, मधुकर जांभळे, कुंभी कारखाना उपाध्यक्ष राहुल खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी एस राऊत, पदाधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी मानले.


