शाहू कॉलेज:पॅरा स्विमिंग स्पर्धेत धवल यश

0
shahu college

राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलाव येथील जलतरणपटूंची कामगिरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलाव येथील जलतरणपटूंनी पॅरा स्विमिंग स्पर्धेत धवल यश मिळविले. दि. १५ ते १८ नोव्हेंबर २०२५ ह्या कालावधी हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत जलतरण तलाव येथील जलतरणपटू रिया सचिन पाटील, अन्नपूर्णा सुनील कांबळे, अथर्व राजेंद्र पाटील, देवेन महेंद्र पवार, प्रथमेश संभाजी कापडे, संस्कार बाबासाहेब हजारे ह्या जलतरणपटूनी धवल यश मिळविले.

           रिया सचिन पाटीलने ५० मी. व १०० मी. फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक व ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवत गुवाहाटी व दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर प्रस्तापित केलेले स्वत:चे विक्रम मोडीत काढले. अन्नपूर्णा सुनील कांबळे हिने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदक व ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पदक मिळवले. अन्नपूर्णा सद्या शाहू कॉलेजमध्ये शिकत आहे. अथर्व राजेंद्र पाटील याने ५० मीटर बॅक प्रकारात कांस्य पदक मिळवले. देवेन महेंद्र पवार याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळविले. प्रथमेश संभाजी कापडे याने ५० मी ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक मिळविले. 

      ह्या सर्व खेळाडूना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे, स्विमिंग कोच मानसिंग पाटील, अंकुश पाटील, संतोष डोकरे, अमर पाटील व सर्व जलतरण तलाव स्टाफ यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *