शाहू कॉलेज:राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजचे धवल यश
प्रा. डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी ह्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, विद्यार्थी दिवेज शिंदे याने द्वितीय क्रमांक, हृषिकेश सावंत व भक्ती कांबळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले
कोल्हापूर, (प्रतिनिधी) माजी मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार (जि. बीड) येथील इंग्रजी विभाग व वाड्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी कोल्हापूर येथील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी ह्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तर बी. सी. एस. विभागाचा विद्यार्थी दिवेज शिंदे याने द्वितीय क्रमांक मिळविला. हृषिकेश सावंत व भक्ती कांबळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. ह्या स्पर्धेसाठी ६२ दर्जेदार निबंध प्राप्त झाले होते.
महाविद्यालयाच्या २२ स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी माजी मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक तसेच व्यक्तिमत्व विकासाशी निगडित विविध विषयांवर सखोल चिंतन मांडले होते. लेखनाची भाषा, विषयाचे आकलन, मांडणी इ. निकषाच्या आधारे स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.
त्यांच्या ह्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


