स्वर्गीय.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन….

0
स्व यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

स्वर्गीय.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन….

कोल्हापूर,(प्रतिनिधी)

  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्यास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीन अभिवादन करण्यात आल. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक आदर्शाची समाजाला गरज असून त्यांचे विचार, समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

      नव महाराष्ट्राचे शिल्पकार ,महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीन कोल्हापूर जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आल.

   प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही बी पाटील जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अशोक पोवार,रमेश मोरे ,राजाभाऊ मालेकर, आर के पोवार ,अनिल घाडगे ,चंद्रकांत सूर्यवंशी ,राजाराम कांबळे ,रमेश पोवार ,महादेव पाटील ,अमृत शिंदे ,फिरोज खान ,सुनील देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *