संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट

0
संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट

राजमाता जिजाऊ फाउंडेशनचा समाजउपयोगी उपक्रम

सांगरूळ (प्रतिनिधी) सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व राजमाता जिजाऊ फाउंडेशन आमशीचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील राजश्री शाहू ग्रंथालयास पाच हजार रुपयाची पुस्तके भेट दिली. तसेच केंद्र शाळा आमशी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जेवण वाटप करण्यात आले. 

                संदीपदादा पाटील आपल्या राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने नेहमी वेगवेगळे समाजउपयोगी कार्यक्रम राबवत असतात. फाउंडेशन मार्फत त्यांनी वर्षभरात जिजाऊ जयंती सप्ताहानिमित्त जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ठेव योजना सुरू केली आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना खेळाचे साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमाला लागणारे साहित्य वाटप केले आहे. वाढदिवसानिमित्त फाउंडेशनच्या वतीने ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पुस्तके व धावण्याचा सराव करण्यासाठी मुलांना बूट वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले. 

         यावेळी या कार्यक्रमाला राजाराम पाटील, सरदार पाटील,धनाजी पाटील, दादासो पाटील, मोहन सावंत, दिलीप सातारे,महादेव पाटील, प्रकाश पाटील,अशोक पाटील, अनिल पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद सावंत, मुख्याध्यापक प्रशांत व्हनाळे, शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *