प्रॅक्टीस फुटबॉल क्लबला किट प्रदान
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रॅक्टीस क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत होते.
कोल्हापूर ता.26 (प्रतिनिधी) सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामाला सोमवारी (दि.१) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठेतील नामवंत फुटबॉल संघ प्रॅक्टीस फुटबॉल क्लबला किट प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रॅक्टीस क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत होते. उद्योगपती अभिषेक मोहिते यांच्या प्रमुख उपस्थिती किट वाटप समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी अमित पाटील व आश्किन आजरेकर यांची उपस्थिती होती.
संघाच्या खेळाडूंना संबोधित करताना उद्योजक अभिषेक माहिते यांनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शंभर वर्षाकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र राज्यातील एकमेव सीनियर संघ असून सदर संघाच्या किट वाटप चा समारंभ माझ्या शुभहस्ते संपन्न होतोय हे मी माझे भाग्य समजतो तसेच संघातील भूतकाळातील वैभव प्राप्त करण्यासाठी वर्तमानामध्ये विद्यमान खेळाडूंनी संघाच्या नावालौकास साजेल असा खेळ करून संघाच्या गत वैभवात भर घालावी असे मनोगत व्यक्त केले.
आश्किन आजरेकर खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले खेळाडूंनी खेळावर श्रद्धा ठेवून प्रॅक्टिस मध्ये सातत्य ठेवले पाहिजे तसेच मॅच खेळत असताना कोणत्याही प्रकारचा विचार न करता चांगल्या प्रकारचा खेळ करत स्पर्धेमध्ये 100% खेळाचे योगदान देऊन संघातील सर्व खेळाडूंनी मॅच जिंकण्याच्या जिद्दीन खेळ केला पाहिजे.
अमित पाटील संबोधित करताना खेळाडूंना प्रोत्साहित करून खेळाडूंनी आपल्या डायट वरती व जिम ट्रेनिंग वरती भर देऊन चांगला खेळ करण्यासाठी सरावांमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे असं सुचित केले अध्यक्ष नितीन सावंत म्हणाले १०० वर्षाच्या संघाचे काम करत असताना जो सन्मान मिळतो तो सन्मान तुम्ही खेळाडूंनी टिकवण्यासाठी स्पर्धेमध्ये चांगला खेळ करून क्लबचे नाव उंचावले पाहिजे. अशी आशा व्यक्त केले.
सर्वांचे स्वागत करताना बाबू पाटील (ज्येष्ठ खेळाडू )म्हणाले कोल्हापूर शहरातील उद्योजक व फुटबॉल खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांनी कोल्हापूरचा फुटबॉल खेळ जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या संघांना आर्थिक मदती उपलब्ध करून देऊ फुटबॉल खेळाच्या वाढीस हातभार लावावा.
या कार्यक्रमास संघातील सर्व खेळाडू तसेच प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे सेक्रेटरी रमेश मोरे संचालक राजू वायचळ व्यवस्थापक अक्षय कोरे, रोहित आळवेकर, रोहन खिरुगडे, विकी पाडळकर, उदय वास्कर, प्रदीप रांगणेकर, शिरीष पाटील, श्रीधर पाटील, सागर माळी, केशव पंडे, दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


