“युवा स्पंदन” रोटरी डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट कॉन्फरन्स उत्साही वातावरणात संपन्न
प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक, गृह विभाग, कोल्हापूर श्री. तानाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी, संयम, वेळेचे महत्व, कोणती ही नशा न करणे, ध्येय निश्चिती करणे पालकांशी असणारे नाते आणि सामाजिक भान याबाबत अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले.
कोल्हापूर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ करवीर, कोल्हापूर आयोजित रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० आयोजित बार्षिक “डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट कॉन्फरन्स युवा स्पंदन २०२५-२६” हा भव्य सोहळा उत्साहपूर्ण, ज्ञानसमृद्ध आणि उर्जावान वातावरणात आनंद भवन, सायबर कोल्हापूर येथे यशस्वीरीत्या पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध शाळांमधील ८०० जून अधिक इंटरॅक्टर्स व शिक्षकांनी या परिषदेत सहभाग नोंदवून नेतृत्व, सेवा आणि व्यक्तिमत्व विकासाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष रो. शितल दुग्गे यांनी स्वागतपर भाषण केले आणि थोडक्यात प्रस्तावना केली. इंट्रॅक्ट कॉन्फरन्स इव्हेंट चेअरमन रो. दिलीप शेवाळे यांनी ही परिषद केवळ कार्यक्रम नसून युवकांच्या ऊर्जा, सेवाभाव आणि नेतृत्वक्षमतेचा उत्सव असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. इंजि. अरुण भंडारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत समाजकार्यात सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक, गृह विभाग, कोल्हापूर श्री. तानाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी, संयम, वेळेचे महत्व, कोणती ही नशा न करणे, ध्येय निश्चिती करणे पालकांशी असणारे नाते आणि सामाजिक भान याबाबत अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले.
यावेळी असिस्टंट गव्हर्नर गौरव शहा, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. गौरी शिरगावकर, डीसीसी रो. निशिकांत नलवडे आणि डिस्ट्रिक्ट इंट्रॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह इशा कामत यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या सुंदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन इंटरॅक्टर आरुष गायकवाड आणि इंटरॅक्टर सही भोसले यांनी केले. उद्धघाटन समारंभाचे आभार प्रदर्शन सेक्रेटरी रो. पंडित जाधव यांनी केले.
परिषदेत दिवसभर प्रेरणादायी आणि सक्षम व्यक्तिमत्वनिर्मितीस पूरक असे सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ. ज्योती जाधव, प्रो व्हाइस चान्सलर, शिवाजी विद्यापीठ यांनी शास्त्रज्ञ कसे होता येते याबाबत विद्वत्तापूर्ण मार्गदर्शन केले तसेच शिक्षणासाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीची सुद्धा माहिती दिली.
कुमारी खुशी बिनोद कांबळे यांनी रॉक क्लाइंबिंग व माउंटेनियरिंगवरील प्रभावी व्हिडिओ प्रस्तुतीकरणासह साहसी क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. रो. प्रा. दयानंद देवमोरे यांनी सकारात्मक विचारसरणीचे सामर्थ्य प्रभावी शैलीत मांडत जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने नेहमी सकारात्मक रहा असे म्हटले. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
दुपारच्या सत्रात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धा सादरीकरणांनी वातावरण अधिकच उत्साही झाले. यानंतर झालेल्या इंटरॅक्ट क्लब अवॉर्डस् सेरेमनी मध्ये भैरव विद्यानिकेतन (आसगाव), बालिंगे स्कूल (बालिंगे) आणि केर्ली माध्यमिक विद्यालय (केर्ली) भैरव विद्यानिकेतन (आसगांव), बालिंगे हायस्कूल (बालिंगे) बड्स इंटरनॅशनल स्कूल (कोल्हापूर) आणि केर्ली माध्यमिक विद्यालय (केर्ली) यांनी केले.
भारतीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक भैरव विद्यानिकेतन आसगाव, द्वितीय क्रमांक सी. व्ही. एस. के. हायस्कूल, कुमठा, तृतीय क्रमांक बड्स इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर, उत्तेजनार्थ राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन चंचुखडी यांनी प्राप्त केला या सर्वांना समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे रो. यतीश शहा यांच्या हस्ते ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. यतीश शहा यांनी यशासाठी आवश्यक अशा सात सवयी विद्यार्थ्यांना प्रेरक उदाहरणांसह समजावून सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी रो. पंडित जाधव यांनी सर्व मान्यवर, वक्ते, सहभागी विद्यार्थी-शिक्षक, तसेच परिश्रम घेणारे इव्हेंट चेअरमन रो. दिलीप शेवाळे, प्रेसिडेंट रो. शितल दुग्गे, इव्हेंट सेक्रेटरी रो. विशाल जांभळे आणि सर्व पदाधिकारी-स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.


