राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये अग्निशमन दलाच्या वतीने प्रात्यक्षिके

0
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये अग्निशमन दलाच्या वतीने प्रात्यक्षिके

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे स्थानक अग्निशमन अधिकारी श्री विजय सुतार यांनी माहीता दिली.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने आपत्कालीन काळातील प्रात्यक्षिकांचे अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले.

   कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे स्थानक अग्निशमन अधिकारी श्री विजय सुतार यांनी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लंजर, फायर एक्स, फायर सूट, स्वाँ कटर, हँड कंट्रोल स्प्रेडर, अग्निमल कॅचर, स्नॅक स्टिक या आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाच्या साधना विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर आग विझवण्याच्या प्रात्यक्षिकामध्ये एल. पी. जी. सिलेंडर लिकेज, पेट्रोल आग, फायर इंस्ट्रीगेशन, आग विझवणे, फायर कॉल अटेंडट यामध्ये घर, जंगल इत्यादी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

   हि सर्व प्रात्यक्षिके कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे स्थानक अग्निशमन अधिकारी श्री विजय सुतार, तांडेल श्री वामन चवरे, वाहन चालक श्री मिलिंद गवळी, फायरमन संभाजी ढेपले व पावन कांबळे आणि सर्व ट्रेनी यांनी सादर केली. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बाॅडी सदस्या सरोज पाटील (माई) स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या चेअरमन सौ. संगीता पाटील, प्र-प्राचार्य प्रोफ, डॉ. डी. आर. भोसले, प्रा. डी. एम. गायकवाड व प्र-उपप्राचार्या सौ. एल. बी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय सिताप, प्रा. के. आर. पाटील आणि प्रा. ए. टी. पाटील यांनी कष्ट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *