महावितरण विरोधातील तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित – विजयराव खोत

0

विजपुरवठा सुरळीत आणि शेतीपंपाला दिवसा वीज : महावितरण चे लेखी पत्र

शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील सर्व गावातील शेतीपंपाचा खंडित विजपुरवठा 10 डिसेंबर पर्यत सुरळीत करून दिवसा वीज पुरवठा करण्याचे महावितरण कार्यालयाने लेखी आश्वासन दिल्याने 5 डिसेंबर रोजीचे तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती माजी सभापती विजराव खोत यांनी दिली

         शाहूवाडी तालुक्यातील सर्व गावामध्ये खंडित असलेला शेतीपंपाचा विद्युत पुरवठा नियमित करून शेतीसाठी रात्री असलेला विजपुरवठा दिवसा करावा अन्यथा 5 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा शाहूवाडी तालुक्याचे माजी सभापती विजयराव खोत यांनी तहसीलदार शाहूवाडी आणि पोलीस निरीक्षक शाहूवाडी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.

            याची दखल घेत महावितरण उप कार्यकारी अभियंता कार्यालय शाहूवाडी यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये असे नमूद केले आहे कि, 33/11 केव्ही मांजरे, 33/11 केव्ही शाहूवाडी, 33/11 केव्ही वारूळ, 33/11 केव्ही थावडे, 33/11 केव्ही सरूड या उपकेंद्रामधून दि. 1 डिसेंबर 2025 पासून शेतीपाला दिवसा विजपुरवठा सुरु केला आहे.कायमस्वरूपी शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करण्यासाठी सोलर सबस्टेशन व सद्य – पॉवर ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढविन्याचे काम प्रगती पथावर आहे.अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठी असलेले विजेचे पोल पडल्यामुळे आणि विजवाहक तारा तुटल्यामुळे खंडित विजपूरवठा सुरळीत केला असून काही ठिकाणी उसात असलेले पोल आणि विजवाहक तारा बदलण्याचे काम सुरु असून विजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे. दि. 10 डिसेंबर 2025 पर्यत संपूर्ण तालुक्यात शेतीपंपाचा विजपुरवठा सुरळीत करून दिवसा विजपुरवठा करणार असेलचे लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. सदरच्या पत्रावर उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग शाहूवाडी यांची स्वाक्षरी आहे. 

     त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील समस्थ शेतकरी वर्गाला शेतीसाठी पाणी आणि वीज यापासून होणाऱ्या त्रासातून थोडीफार मुक्तता होणार आहे. त्यामुळे दि 5 डिसेंबर रोजी माजी आम. सत्यजित पाटील, मानसिंगदादा गायकवाड भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वा खाली तहसीलदार कार्यालय शाहूवाडी येथे होणारे तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती शाहूवाडी तालुक्याचे माजी सभापती विजयराव खोत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *