शित्तूर-वारुण येथे गुरुचरित्र पारायण सोहळा
श्री दत्तजयंती सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता.
शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण येथे प्रतीवर्षी प्रमाणे गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात गुरुचरित्र वाचन, अखंड प्रहर नाम, भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी सुरु होणाऱ्या आरती, पठण, वाचन, कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तिमय होऊन गेले होते.आयोजक मंडळींनी कार्क्रमाचे अगदी काटेकोर नियोजन केल्यामुळे हा अद्भुत सोहळा भाविकांच्या मनाला भाऊन गेला. प्रत्येक दिवशी होणाऱ्या कीर्तन आणि प्रवचनासाठी लहान-थोर मंडळी आणि महिला भगिनींचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला. यावेळी घेण्यात आलेल्या कीर्तन आणि प्रवचनातून अध्यात्मा सोबत समाज प्रबोधनाचे कार्यही मोठया प्रमाणात पार पडले त्यामुळे हा पारायण सोहळा शित्तूर-वारूनच्या अध्यात्मिक क्षेत्रातील सुवर्णंपान ठरला आहे.
श्री दत्त जयंती निमित्त आणि गुरुचरित्र पारायण सोहळा समाप्तीच्या अनुषंगाने आयोजकांनी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडीसाठी गावातील भाविक भक्त मोठया प्रमाणात उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजक यांच्या सुरेख आणि काटेकोर नियोजनामुळे 2025 सालातील पारायण सोहळा अविस्मरणीय अशा प्रकारचा उत्सव पार पडला.


