चंदुर ग्रामसभेत ग्रा.प. थकबाकी सवलतीस विरोध

0
WhatsApp Image 2025-12-08 at 6.51.07 PM

चंदूर (प्रतिनिधी )
चंदुर (ता. हातकणंगले) येथील विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांकडून मालमत्ताकर,पाणीपट्टी व इतर करांच्या थकबाकीमध्ये ५०% सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास कडाडून विरोध करण्यात आला. सवलत द्यायचीच असल्यास कर भरणा करणाऱ्या सर्व मिळकत धारकांनाही समान सवलत देऊन राज्य शासनाने ग्रा.प.ला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली व तसा ठराव करणारी बहुदा पहिलीच ग्रामपंचायत असावी.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतकडील निवासी कर व पाणीपट्टी कर यामध्ये थकीत खातेदारांना ५०% सूट देणे विषयी चंदूर ग्रामपंचायतीने आज सोमवार ता.८ रोजी श्री महासिद्ध मंदिर हॉलमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. सदर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील हे होते.
सभेच्या कामकाजास सुरवात ग्रामपंचायत सदस्य संदिप कांबळे यांनी प्रास्ताविकाने केली व सभेपुढील विषयाचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी टी. पी. माने यांनी केले. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन झाल्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवा बत्ती कर इत्यादी करांच्या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक१ एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम करामध्ये थकबाकीदारांना सवलत देण्याचा निर्णय हा ग्रामपंचायतीचा ऐच्छिक असून तो ग्रामसभेमध्ये मांडून हा या ग्रामसभेमध्ये घेतलेल्या निर्णयाचे अभिप्राय शासनाला पाठवून देण्याचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रत्येक वर्षी नियमित घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या उपस्थित खातेदारांनी आम्हालाही ५०% सवलत मिळणेची मागणी केली. तसेच सदर खातेदारांनी थकबाकी खातेदारांना ५०% सवलत देणेस विरोध केला. संभाजी शिनगारे ,विजय माने ,प्रकाश तावरे, प्रकाश पाटील ,ओंकार पाटील ,विजय पाटील कल्लाप्पा मंगसुळे ,संतोष पुजारी, राहुल कांबळे रविंद्र झेले, अप्पासो पाटील इत्यादी नागरिकांनी नियमित घरफाळा भरणाऱ्या खातेदारावर अन्याय होतो व सदर खातेदारांनी नियमित घरफाळा व पाणीपट्टी कर भरलेल्या रक्कमेवर सवलतीची मागणी केली. थकीत सर्व खातेदारांची यादी ग्रामपंचायतची समोर बोर्डावर लावण्यात यावी.
ग्रामपंचायतकडून नियमित घरफाळा भरणाऱ्या खातेदारांना सप्टेंबर अखेर ५% सूट देणेत येते. तसेच तुलनात्मक दृष्ट्या आपले ग्रामपंचायतीचे कराचे दर व पाणीपट्टीचे दर आसपासच्या ग्रामपंचायतीच्या करापेक्षा कमी आहेत. तसेच सवलत दिले नंतर होणारे दुष्परिणामाची चर्चा करीत असताना सध्या ग्रामपंचायतीचा खर्च जे नागरिक नियमित कर भरतात त्यांच्या करामधून केला जातो. जर थकबाकी खातेदारांना ५०% सवलत दिली तर प्रत्येक वर्षी नियमित घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या खातेदारांच्यावर अन्याय होईल. तसेच ते हि इथून पुढचा घरफाळा भरणेस टाळाटाळ करतील त्यामुळे दिवाबत्ती, कर्मचारी पगार, वीज बिल, असे दैनंदिन खर्च भागविणे अशक्य होईल. अशी सभेत उपस्थित नागरिकांनी चर्चा केली. त्यामुळे थकबाकी खातेदारांना ५०% कर सवलत देणे विषयीचा ठराव ग्रामसभेमध्ये बहुमताने नामंजूर करणेत आला.
सदर सभेस सरपंच स्नेहल कांबळे,उपसरपंच बाबासाहेब मंगसूळे, ग्रा.प.सदस्य शालन पाटील, मारुती पुजारी, भाऊसाहेब रेंदाळे,संजय जिंदे,फिरोज शेख, योगिता हळदे,वैशाली पाटील,रोहिणी घोरपडे, तसेच सुधाकर कदम,बाबासो पुजारी,सचिन हळदे, सचिन पुजारी. व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सरपंच स्नेहल कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *