रयतच्या शाहू कॉलेजमध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा
रयतच्या शाहू कॉलेजमध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी) मोबाईल, सोशल मिडिया ह्या सारख्या समाजमाध्यमाच्या अजस्त्र विळख्यातून समाज बाहेर निघावा. त्याने स्वत: च्या जाणीवाकडे लक्ष द्यावे. त्याला डिजिटल वेल बीईंग काय असते याची जाणीव व्हावी. ह्या हेतूने आज जगभर वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे साजरा केला जातो. माय लाईफ बियोंड स्क्रीन ही मध्यवर्ती संकल्पना घेवून महाविद्यालयाचा आर्ट क्लब, सांस्कृतिक विभाग, महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संपन्न झाला.
सर्वप्रथम सर्वांनी सामूहिकरित्या डिजिटल डिटॉक्स डेनिमित्तची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर क्रमाक्रमाने विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपल्या कला सादर केल्या. ह्यामध्ये डॉ. बी. बी. घुरके यांनी इंद्रजीत भालेराव यांची कविता सादर केली. डॉ. बी. एम. मगदूम यांनी विनोद कथन केले. प्रा. ज्योती कांबळे, श्रद्धा दुधाळे, प्रीती चोपडे, स्वप्ना पवार, अर्थव पवार, स्नेहा गोरवे यांनी हिंदी व पाश्च्यात गीतांचे सादरीकरण केले. तर साक्षी सावंतने मोबाईलच्या दुष्परिणाम ह्यावर भाषण केले. याचाच एक भाग म्हणून मधुबनी चित्रकलेवर एक कार्यशाळा घेण्यात आली.
ह्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ.डी. आर. भोसले, अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. यु. एस.शेळके, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे, ज्यु. विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण व महाविद्यालयाच्या सिनिअर व ज्युनिअर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्ट क्लबच्या प्रमुख डॉ. एम. ए. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बी. बी. घुरके यांनी केले


